Chikkodi

अविरत प्रयत्नातून अंकिता कोण्णूर या विद्यार्थिनीने गाठले यश

Share

 

चिकोडी तालुक्यातील सदलगा परिसरातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम सेवा संघाच्या बिगबाईट कॉम्पुटर सेंटर आणि आर के फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

दहावी परीक्षेत उत्तम यश मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. (फ्लो)

यावेळी सत्काराला उत्तर देताना दहावी परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या अंकिता कोण्णूर या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जग जिंकता येऊ शकते, अविरत प्रयत्न केल्यास नक्कीच यश मिळू शकते असे विचार मनाशी बाळगून प्रत्येकाने प्रयत्न करावेत असे विचार विद्यार्थिनीने व्यक्त केले.

सदलगा शहरातील शासकीय हायस्कूल येथे झालेल्या कार्यक्रमात मयुरी सुतार या विद्यार्थिनीच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर राज्यात प्रथम आलेल्या अंकिता कोण्णूर या विद्यार्थिनीचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बोलताना पी. जी. कोण्णूर म्हणाले, सध्याची मूल्यमापन पद्धत बदलली आहे. हल्ली सामान्य ज्ञान महत्त्वाचे असून गुणांचे मूल्य कमी होत असल्याचे ते म्हणाले.

या कार्यक्रमास साहित्यिक अप्रित जमादार, अर्जुन नीडगुंदि, सदलगा पीएसआर गुरूबेट्टी, अब्दुल कलाम संघाचे अध्यक्ष अजरुद्दीन शेखजी, सरदार सनदी अण्णासाहेब कदम आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले. यावेळी सरकारी हायस्कुलमधील टॉप ३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा अब्दुल कलाम सदलगा हायस्कुलच्या वतीने गौरविण्यात आले.

यावेळी सुनील बेळकुडे, हरीश हेत्तलमनी, सुनील मुतनाळे, फिरोज चांद साब सनदी, तुषार आदी गुणवंत विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.

Tags: