Vijayapura

तरुणाच्या निर्घृण हत्येप्रकरणी चार आरोपींना अटक

Share

विजयपूरमध्ये तरुणाच्या निर्घृण हत्येच्या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. पोलीस तपासादरम्यान व्याजी धंद्यात पैसे वसुलीसाठी तगादा लावणाऱ्या व्यक्तीचा पार्टीच्या नावाखाली खून कण्र्यात आल्याचे समोर आले.

विजयपूर येथील एपीएमसी मार्केटमधील मेंढ्यांच्या बाजारात रोहितचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. एपीएमसी मार्केटच्या मागे असलेल्या मेंढी मार्केटजवळ हा खून झाला. एपीएमपी स्टेशनच्या पोलिसांनी रोहितच्या खुनाच्या आरोपींचा माग काढला आणि 48 तासांच्या आत त्यांना अटक केली.

मुझम्मीर कादरी, साईनाथ पवार, शरणू कुरी आणि आणखी एक बालगुन्हेगार. यासह चार जणांना एपीएमसी पोलिसांनी अटक केली आहे या हत्येचे मुख्य कारण म्हणजे व्याजी सावकारी . खून झालेला रोहित पवार कर्ज वसुलीसाठी त्रास देत होता. त्याने वसंत चव्हाण यांच्याकडून पैसे घेऊन मुझम्मीर कादरी आणि साईनाथ पवार यांना पैसे दिले.

वसंत चव्हाण यांनी मुझम्मीर कादरी यांना 2 लाख आणि साईनाथ पवार यांना 80 हजारांचे कर्ज दिले होते. ही रक्कम वसूल करण्यासाठी वसंत चव्हाण याने रोहितला काम दिले होते. व्याजाच्या पैशावरून तो मुझम्मीर आणि साईनाथला सतत त्रास देत होता. या मुद्द्यावरून सर्वांनी एकत्र येऊन रोहित हत्येचा प्लॅन आखला . व्याजाची रक्कम वसूल करण्यासाठी रोहित पवार त्रास देत होता . . त्यामुळे त्याने रोहित पवार याला बोलावून दारूची पार्टी करून त्याचा खून करून , मृतदेह झुडुपात टाकून तेथून पळ काढला.

तपासादरम्यान हत्येचा मूळ प्रकार समोर आला आणि आरोपींना अटक करण्यात आली . पोलिसांनी वसंत चव्हाण याच्याविरुद्ध व्याज व्यवसायाप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी मुलाच्या अपहरण प्रकरणात वसंत चव्हाण यांचे नाव आले होते. विजयपूर जिल्ह्यातील व्याज व्यवसायात अडचणीत असलेल्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक ऋषिकेश सोनवण यांनी केले आहे.

Tags: