Banglore

हरीश पुंजा यांच्याविरोधात तक्रार दाखल करणे निंदनीय

Share

निवडणूक आचारसंहिता लागू असताना बेकायदेशीर खाणकाम प्रकरणी बेळ्तंगडीचे आमदार हरीश पुंजा यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आली असून हे निंदनीय आहे, या आधारे आमदारांना अटक झाली तर पक्ष स्वस्थ बसणार नाही. पुढील विकासाची जबाबदारी सरकारलाच घ्यावी लागेल, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांनी दिला.

भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी ते बोलत होते. बेकायदेशीर खाणकाम प्रकरणी बेळ्तंगडीचे आमदार हरीश पुंजा यांच्या नावावर एफआयआर नोंद करणे यामागे षडयंत्र आहे. बेळ्तंगडी युवा मोर्चा मंडळाचे अध्यक्ष शशिराज यांचे नाव तक्रारीत नोंद करण्यात आले याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या हरीश पुंजा यांच्यावर पोलिसांनी दडपशाही आणि अधिकाराचा दुरुपयोग करून एफआयआर दाखल केली. त्यांना अटक झाल्यास पक्ष स्वस्थ बसणार नाही. पोलिस आमच्या कार्यकर्त्यांवर अत्याचार करत आहेत. पोलिस बदला घेण्याचे काम करत आहेत. असा आरोप विजयेंद्र यांनी केला.

आचारसंहितेच्या बहाण्याने आमदाराला अटक करणे चुकीचे आहे. आमचा संघर्ष विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम करत आहे. कार्यकर्त्यांच्या वेदना आणि अत्याचार पाहणारे हरीश पुंजा यांनी एका भावनेने पोलिसांना जाब विचारला मात्र पोलिसांनी याचा गवगवा केला, हे योग्य नाही .या सबबीवरून आमच्या आमदार व कार्यकर्त्यांना अटक झाल्यास आम्ही तीव्र लढा देऊ. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्यासाठी पोलीस मदत करत आहेत. पुढील विकासाची जबाबदारी पोलिसांवर असेल. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी हस्तक्षेप करून दडपशाही थांबवण्यासाठी पोलिस प्रमुखांशी बोलावे, अशी मागणी बी.वाय. विजयेंद्र यांनी केली.

Tags: