पावसाळा हा शेतकऱ्यांसाठी आशादायी शेतीचा हंगाम असून, शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून विक्रेत्यांनी बियाणे, खते आणि कीटकनाशके निश्चित दराने पुरवावीत, असे कृषी सहायक संचालक निंगाण्णा बिरादार यांनी सांगितले.
अथणी नगर येथील सहाय्यक कृषी संचालक कार्यालयात मंगळवारी झालेल्या कृषी अवजारे विक्रेत्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत होते.
दुकानमालकांनी कोणत्याही प्रकारे बनावट बियाणे व निकृष्ट बियाणांचा पुरवठा केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
निंगाण्णा बिरादार (सहाय्यक कृषी संचालक) उमेश हावरेड्डी, शिवपुत्र गुंजीगावी, यंकप्पा उप्पार , अरुण पाटील (कृषी अधिकारी) राजू नाडगौडा , आनंद कुंभार , शिवराज पाटील यांच्यासह तालुक्यातील सर्व कृषी अवजारे विक्रेते उपस्थित होते.
Recent Comments