राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी काँग्रेस सरकार हमी योजनांचे प्रदर्शन करत आहे. मात्र गेल्या वर्षभरात काँग्रेसने भाववाढ आणि शून्य यश ही भेट जनतेला दिली असल्याची टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.वाय. विजयेंद्र यांनी केली.
भाजप राज्य कार्यालयात आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्ताधारी सरकारच्या अपयशाचा पाढा वाचत गेल्या वर्षभरात एकही नवीन प्रकल्पाचे भूमिपूजन झाले नाही त्यामुळे सरकारच्या अपयश आणि कामगिरीबद्दल विधायक सूचना देणे हे विरोधकांचे कर्तव्य आहे, असे ते म्हणाले. कर्नाटकात अशी परिस्थिती असूनही मुख्यमंत्री कर्नाटकचे उदाहरण देशासमोर ठेवत असल्याचा टोलाही बी. वाय. वीजयेंद्ग यांनी लगावला.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि सरकारने केंद्र सरकारशी संघर्षाचा मार्ग पत्करण्याचा नवा प्रयोग केला आहे. दुष्काळ निवारण व्यवस्थापनात शेतकऱ्यांच्या झालेल्या दुरवस्थेला केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपल्यावरील जबाबदारी झटकली अशी टीकाही त्यांनी केली.()
विकासाला बसलेली खीळ, कायदा व सुव्यवस्था कोलमडल्याने होत असलेल्या घटना, भांडवल गुंतवणुकदारांची मंदी, महिलांसाठी असुरक्षिततेची भीती, शेतकऱ्यांबद्दलची उदासीनता, दरवाढ या साऱ्या काँग्रेसच्या अपयशाच्या गोष्टी असल्याचे बी.वाय. विजयेंद्र म्हणाले.
विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनीही काँग्रेसवर ताशेरे ओढले. काँग्रेस अधिकारात आल्यापासून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यामध्ये खुर्चीसाठी रस्सीखेच सुरु असल्याची टीका आर. अशोक यांनी केली.
काँग्रेसमध्ये जातीय दुफळी आहे. जिल्ह्यात दुफळी आहे.राज्याच्या विकासाला दुय्यम दर्जा देण्यात आहे. राज्यात वर्षभरात कोणताच विकास झाला नसल्याचा आरोप आर. अशोक यांनी केला.


Recent Comments