बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील करोशी गावात विजेच्या धक्क्याने विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
जयश्री दुंडाप्पा चौगला (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे. जयश्री ही घराच्या मागे कपडे वाळत घालत असताना घरातील पंख्याच्या वायरला स्पर्श झाल्याने विजेचा धक्का बसून जयश्रीचा जागीच मृत्यू झाला .
चिक्कोडी सार्वजनिक रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. मृत जयश्री यांच्या पश्चात सासू, पती, एक मुलगी व एक मुलगा असा परिवार आहे. जयश्रीच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून करोशी गावात शोककळा पसरली आहे.
Recent Comments