धारवाडच्या हद्दीतील होयसळ शहराच्या हद्दीत समोरून जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात , समोरून येणाऱ्या ट्रकला धडकल्याने कारमधील प्रवासी किरकोळ जखमी झाले.
धारवाड होयसळ शहराच्या बाहेरील राष्ट्रीय महामार्ग पुलाजवळ हा अपघात झाला. मात्र, आंध्रप्रदेश नोंदणीकृत कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. अरुंद रस्त्यावरून पुढे जाणारी लॉरी ओव्हर टेक करण्यासाठी जाऊन थेट समोरून येणाऱ्या गाडीला धडकली. त्यामुळे कारचा पुढील भागाचे पूर्णपणे नुकसान झाले .

कारमध्ये तीन प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. जनतेच्या माहितीवरून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन अपघातग्रस्त वाहन मोकळे करून वाहतूक सुरळीत केली .


Recent Comments