नादांजली म्युझिक फाऊंडेशनतर्फे नादवैभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नादांजली म्युझिक फाऊंडेशनच्या वतीने आज बेळगाव शहरातील एका खाजगी हॉटेलच्या सभागृहात नादावैभव कार्यक्रम पार पडला.

पूनम गुलाबानी, ज्योती बदामी यांची प्रमुख उपस्थिती होती. आदर्श गुलबानी यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. अंतरा कुलकर्णी आणि स्वाती सुतार या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. नादांजली म्युझिक फाऊंडेशनच्या संस्थापक शैलजा कुलकर्णी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.

यावेळी विविध गायकांनी आपल्या अप्रतीम सुरांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. नादांजली म्युझिक फाऊंडेशनच्या संस्थापक शैलजा कुलकर्णी यांनी इन न्यूजला याबाबत अधिक माहिती दिली. बेळगाव जिल्ह्यातील गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नादांजली म्युझिक फाऊंडेशन कार्यरत आहे, असे त्या म्हणाल्या . या वेळी अनेक गायकांचा सहभाग होता.


Recent Comments