दर दोन वर्षांनी या मंदिराचा यात्रोत्सव आयोजिण्यात येतो. क्रांतिवीर संगोळ्ळी रायन्ना फाशीस्थळी असलेल्या या देवस्थानात यात्रोत्सवाच्या निमित्ताने मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतात.

या भागातील हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार दर दोन वर्षांनी भरणाऱ्या या यात्रोत्सवात विविध धार्मिक विधींचे आयोजन करण्यात येते. यासंदर्भात ग्रामस्थ ज्योतिबा पाटील यांनी माहिती देताना, माउली मंदिराची यात्रा मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात येते, या यात्रेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रशासनाने खुली जागा उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

इराप्पा पाटील या ग्रामस्थाने माहिती देताना, गावचा इतिहास सांगितला. गरबेनहट्टी हे गाव प्लेगच्या साथीमुळे शेजारच्या भागात स्थलांतरित झाले आहे, परंपरेप्रमाणे आमचे पूर्वज येथील माउली मंदिरात पूजा करत आहेत, त्यामुळे या जागृत मंदिराचा यात्रोत्सव साजरा करण्यासाठी दोन वर्षांऐवजी एक वर्षाने यात्रा भरविण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली.
यावेळी गावचे पंच सातेरी वारगावडे, शिवानंद पाटील, राहुल पाटील, भैरू पाटील, सातेरी गोरे, इसाक मुजावर आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि भाविक उपस्थित होते.


Recent Comments