Dharwad

धारवाडमध्ये घरफोडी करणाऱ्या चोरांना अटक

Share

धारवाड विद्यागिरी पोलीस स्थानकाच्या व्याप्तीतील रेश्मा कंदकल यांच्या घरी चोरी केलेल्या चोरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

लक्ष्मीगिरी येथील मंजुनाथ हुल्लूर, धारवाडच्या होसयल्लापूर येथील विनोद किरगी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून ८४ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने तसेच तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

विद्यागिरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक संगमेष दिडीगनाळ यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय प्रमोद एच. जी., आय. आय. मदरखंडी, बी. पी. धुमाळ, एम. सी. मंकणी, बी. एम. पठात, आनंद बडिगेर, महांतेश वाय. एम., लक्ष्मण लमाणी, सागर कुंकुमगार, रमेश कोतंब्री, उषा एम. एच. आदींनी कारवाई पार पाडली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींनी यापूर्वी बेळगाव, विजयपूर, बागलकोट आदी भागात चोरी केल्याची माहिती उपलब्ध झाली असून सराईत गुन्हेगारीत सक्रिय असलेल्या आरोपींना अटक केल्याबद्दल कारवाईत पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस आयुक्त रेणुका सुकुमार यांनी बक्षीस घोषित केले आहे.

Tags: