Belagavi

वचन साहित्य म्हणजे मानवजातीशी बांधलेली सद्गुणांची गाठ : डॉ. बासू बेवीनगिडद

Share

वचनसाहित्य ही मानवजातीच्या उद्धारासाठी बांधलेली सद्गुणाची गाठ असल्याचे मत धारवाड आकाशवाणी केंद्राचे संचालक डॉ. बसू बेवीनगिडद यांनी व्यक्त केले.

बेळगावमधील प्रभुदेवा सभागृहात जागतिक लिंगायत महासभा आणि नागनूर रुद्राक्षी मठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बसव जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. ‘१२ व्या शतकातील महिला वचनकार’ या विषयावर ते बोलत होते. संत बसवेश्वरांनी महिलांना दिलेल्या सामान संधीच्या तत्वांबद्दल यावेळी त्यांनी व्याख्यान दिले.

यावेळी हंदीगुंद सिद्धेश्वर मठाचे शिवानंद स्वामी यांनी संत बसवेश्वरांनी दिलेल्या तत्वांचा केवळ गौरव करण्यापेक्षा त्या तत्वांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. भारताची पहिली संसद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अनुभव मंडपात अनेक नैतिक मुद्दे मांडण्यात आले परंतु आधुनिक संसद हि कागदी व्यवस्था असून या संसदेत समाजाच्या समस्यांवर उपाय नसल्याबाबत त्यांनी खेद व्यक्त केला.

बसव जयंती सोहळ्याचे उदघाटन गदग, डंबळ, येडीयुर जगद्गुरू तोंटद संस्थान मठाचे जगद्गुरू यांच्याहस्ते झाले. यावेळी बोलताना तोंटद संस्थान मठाचे सिद्धराम महास्वामी म्हणाले की, 12 व्या शतकात राजे राजवाडे सोडून बसवण्णांनी दिलेले धार्मिक स्वातंत्र्य अनुभवू लागले. संत बसवेश्वरांचे वचन साहित्य हे लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचले. कायक वाचनातील दया, दासोह धर्म यासारखे आदर्श आजही समाजाचे नेतृत्व करत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे नेतृत्व नागनूर रुद्राक्षी मठाचे डॉ. अल्लम प्रभू महास्वामी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हाध्यक्ष बसवराज रोट्टी हे होते. यावेळी बोलताना त्यांनी, संत बसवेश्वरांच्या तत्वांविषयी मनोगत मांडले. जागतिक लिंगायत महासभेचे जिल्हा सचिव अशोक मळगली यांनी स्वागत व परिचय करून दिला. शहर सचिव सी.एम. बुदिहाळ यांनी सूत्रसंचालन तर राजशेखर पाटील यांनी आभार मानले.

Tags: