Belagavi

झोपेत असणाऱ्या काँग्रेस सरकारने राजीनामा द्यावा : भाजपाची निदर्शने

Share

राज्यात कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. हत्या होऊनही राज्य सरकार झोपेतून जागे होत नसल्याचा आरोप करत बेळगाव शहरात भाजपच्या वतीने आज जोरदार निदर्शने करण्यात आली.

शनिवारी बेळगावातील राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथून काँग्रेस सरकारविरोधात भव्य आयोजित करण्यात आली होती. यावेळी इन न्यूजशी बोलताना माजी आमदार तथा बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष संजय पाटील म्हणाले की, हमीभाव योजनांकडे जनतेचे लक्ष वेधून काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले आहे. मात्र राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. नेहा हिरेमठच्या हत्येनंतर सरकारला जाग यायला हवी होती. मात्र त्यानंतरही योग्य ती कारवाई न झाल्याने हुबळी येथे पुन्हा अंजली अंबिगेरची हत्या करण्यात आली. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार हे केवळ सत्तेचे भुकेले आहेत. सिद्धरामय्या हे केवळ नावापुरते मुख्यमंत्री असून सर्व सूत्रे डी. के. शिवकुमार यांच्या हाती असल्याचा आरोप संजय पाटील यांनी केला.

तसेच उज्वला बडवाण्णाचे यांनीही काँग्रेस सरकारवर टीका करत राज्यातील महिलांना सुरक्षा न देणाऱ्या सरकारने तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी केली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था संपूर्णपणे ढासळली असून राज्य सरकार झोपेतून जागे होत नसल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावेळी माजी उपमहापौर रेश्मा पाटील, मुरुगेन्द्रगौडा पाटील, शिल्पा केकरे आदींसह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: