Belagavi

सुळग्यात गॅस सिलिंडरचा स्फोट!

Share

घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना ळगाव तालुक्यातील सुळगा (हिं.) येथे शनिवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास घडली.

कल्लाप्पा पाटील (वय 62) व सुमन पाटील (वय 60) अशी सिलिंडर स्फोटात गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. पहाटे लाईट स्विच सुरु करण्यास गेल्यानंतर हा स्फोट झाला असून या स्फोटात संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

घरातील साहित्य स्फोटामुळे सर्वत्र विखुरलेले दिसून आले शिवाय खिडक्यांच्या काचाही फुटून पडल्या होत्या. या स्फोटात पती पत्नी ७० टक्के भाजले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेची काकती पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

Tags: