बेळगावमधील एअरमन ट्रेनिंग स्कूल मधील वैद्यकीय सहाय्यक प्रशिक्षणार्थींचा जॉइंट बेसिक फेस ट्रेनिंग पूर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
वैद्यकीय सहाय्यक प्रशिक्षणार्थींच्या 20 आठवड्यांच्या जॉइंट बेसिक फेस ट्रेनिंग (जेबीपीटी) यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल एअरमन ट्रेनिंग स्कूल मध्ये समारंभ आयोजित करण्यात आला होता. प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रशिक्षणार्थी त्यांच्या व्यावसायिक टप्प्यातून वैद्यकीय प्रशिक्षण केंद्र, बेंगळुरू येथे पुढील प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहेत.
यावेळी एटीएस एअर ऑफिसर कमांडिंग, एअर कमांडर एस. श्रीधर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रशिक्षणार्थींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. एअरक्राफ्ट्समनचे प्रशिक्षण घेणारे आशुतोष स्वैन यांना ‘सर्वोत्कृष्ट शैक्षणिक’, एअरक्राफ्ट्समन , रोशन पांडा ‘बेस्ट इनडोअर ट्रेनिंग’ आणि एअरक्राफ्ट्समन तर सुदिप्तो धारा यांना ‘कोर्सचा सर्वोत्कृष्ट ऑलराउंडर’ म्हणून गौरवण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी भारतीय हवाई दलाच्या कार्यप्रणालीबद्दल माहिती दिली. प्रशिक्षणार्थींना वैद्यकीय क्षेत्रातील तंत्रज्ञान अवगत करून घ्यावे, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींना केले.


Recent Comments