Banglore

ओक्कलिग समुदाय आपल्या विरोधात जाईल याची काँग्रेस नेत्यांना भीती :आर अशोक

Share

विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आर अशोक यांनी आरोप केला की खासदार प्रज्वल रेवन्ना प्रकरणात ओक्कलिग समुदाय आपल्या विरोधात जाईल या भीतीने काँग्रेस नेते भाजपवर आरोप करत आहेत.

बंगळुरू येथे पत्रकार परिषदेत बोलताना आर अशोक यांनी सांगितले कि , प्रज्वल परत आलेले नाहीत, एसआयटीने अटक करून आणले नाही. हासन येथील काँग्रेस कार्यकर्त्यांकडेही व्हिडिओ आणि पेनड्राइव्ह असल्याची सीबीआय चौकशी केल्यास प्रज्वलला आणता येईल. त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांचे मोबाईल तपासावेत, काँग्रेस कार्यकर्त्यांची चौकशी का केली नाही, काँग्रेसवाले हे सर्व मोठ्या पूर्वयोजनेने करत आहेत, असे ते म्हणाले.

खासदार प्रज्वल रेवण्णा प्रकरणात ओक्कलिग समाज आपल्या विरोधात जाईल या भीतीने काँग्रेसचे नेते भाजपवर आरोप करीत आहेत . काँग्रेसने पेन डाईव्ह शेअर केला , यात शंका नाही. आर अशोक यांनी आरोप केला की ते आता भाजपवर आरोप करत आहेत.

Tags: