वीर मदकरी गर्जना संघाच्या वतीने १५ मे रोजी राजा वीर मदकरी यांच्या स्मृतिदिनाचे आचरण करण्यात आले.
राजा वीर मदकरी यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून कन्नड आंदोलक श्रीनिवास ताळूकर यांनी वीर मदकरी यांच्याविषयी माहिती दिली.
वीर मदकरी यांची तत्वे आदर्शवत असून त्यांचे विचार आणि तत्वे बेळगावकरांना माहीत व्हावीत यासाठी आरपीडी चौकाचे नामकरण वीर मदकरी असे करण्यात यावे, यासाठी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि महिला व बालकल्याण विकास विभाग मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे मागणी करण्यात येत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी संघाचे राज्य अध्यक्ष आनंद रामा शिरूर, संजय देशपांडे, संजू भजंत्री, चेतन पुजारी, राजू क्यारकट्टी आदी उपस्थित होते.


Recent Comments