Belagavi

देवांग समाज हे प्रामाणिकपणा आणि चिकाटीचे दुसरे नाव : श्री गुरुसिद्धस्वामीजी

Share

श्री बनशंकरी देवीच्या मूर्तीच्या स्थापनेचा शताब्दी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

बेळगाव शहरातील खासबाग येथील उप्पार गल्लीतील देवांग समाजातर्फे श्री बनशंकरी देवीच्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा शताब्दी कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. कारंजी मठाचे श्रीगुरू सिद्ध स्वामीजी यांच्या दिव्य उपस्थितीत या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. उद्घाटनावेळी व्यासपीठावर श्री बनशंकरी मंदिराचे अध्यक्ष मारुती बांगोडी, शंकर बुचडी, निंगाप्पा खामकर , सुरेश कित्तुर, किशोर बडगावी, व्यंकटेश वनहल्ली आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

या प्रसंगी कारंजी मठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांनी आशीर्वाद दिला . देवांग समाज हा कष्टाळू आणि प्रामाणिक आहेत. शाहपूरची साडी प्रसिद्ध करण्याचे श्रेय देवांग समाजाला जाते. मंदिरे केवळ पूजेपुरती मर्यादित न राहता समाजाच्या उन्नतीकडे नेणारी ठरली पाहिजे, असे ते म्हणाले.

प्राचीन देवांग समाज देशभर पसरलेला आहे. पण समाजकार्य विसरलेले नाही. सुरेश कित्तूर व किशोर बडगावी यांनी देवांग समाजाने पुढील विकासासाठी संघटित व्हावे, असे आवाहन केले.  उद्या होणा-या कलश मिरवणुकीत सुवासिनीना बांगड्या भरण्याचा कार्यक्रम होणार आहे .
आज सायंकाळी भरतनाट्यम व भजनाचा कार्यक्रम, उद्या सकाळी कलश मिरवणूक, 18 रोजी नवचंडी होम, 19 रोजी महा कुंभभिषेक कळसारोहण व सायंकाळी महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.

आनंदकुमार लट्टी , बसवराज झाडपन्नावर, बसवराज अत्तिमरद यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.

Tags: