बेळगावच्या फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या वतीने आपाचीवाडी येथील हालसिद्धनाथ देवस्थान गोशाळेला पशुखाद्याचे वितरण केले.
फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्यावतीने सातत्याने करण्यात येणाऱ्या समाजकार्याची दखल आपाचीवाडी येथील हालसिद्धनाथ देवस्थान गोशाळेने घेत या गोशाळेत असणाऱ्या घोड्यांसाठी पशुखाद्य पुरविण्याची विनंती केली होती. या विनंतीला अनुसरून फेसबुक फ्रेंड सर्कल टीमने 13 पोती पशुखाद्य हालसिद्धनाथ देवस्थान गोशाळेला सुपूर्द केले आहे.
यावेळी फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे संतोष दरेकर, श्रीनिवास बत्तुलकर, विशाल पाटील, नितीन एल, विनायक एल, कला मुझुमदार, रोहन कुलकर्णी, प्रणाली परब, श्रीमती राधा अनवेकर, मृणाल बापट, श्रीनाथ के.ए., सुनील धोंगडी, शैलेश भातकांडे, डॉ. समीर एस , डॉ आनंद तोट्टगी , रेखा नायडू , सुदीप बिलावर तसेच श्री हालसिद्धनाथ देवस्थानचे रणजितसिंग पाटील विजय शिंत्रे, विनायक शिंत्रे, तानाजी चौगले, कृष्णनाथ चव्हाण, शंकर वास्कर, मुरारी पुजारी, सुरेश पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments