काही तांत्रिक अडचणींमुळे रखडलेले बेळगाव सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे लवकरच उद्घाटन होणार असून हे रुग्णालय लवकरच जनतेच्या सेवेत हजर होणार असल्याची माहिती बीम्स संचालक अशोक कुमार शेट्टी यांनी दिली.
१४० कोटी रुपयांच्या खर्चातून बेळगाव शहरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्यात आले आहे. काही तांत्रिक कारणामुळे अद्याप या हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले नाही, मात्र नागरिकांची प्रतीक्षा आता संपली असून लवकरच या हॉस्पिटलचा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे अशी माहिती जिल्हा रुग्णालयाचे संचालक अशोक कुमार शेट्टी यांनी दिली.
बेळगाव सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे काम पूर्णत्वास आले असून अग्निशमन अग्निशमन विभागाची परवानगी मिळण्याची प्रतीक्षा आहे. या हॉस्पिटलचे सर्व बारीकसारीक कामकाज पूर्ण करण्यात आले असून लवकरच हे हॉस्पिटल रुग्णांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे ते म्हणाले. प्रसूती विभागात बरेच बदल करण्यात आले आहेत. बाळ आणि बाळंतिणीसाठी गरम पाण्याची सोय, रुग्णालयाची स्वच्छता याकडे बारकाईने लक्ष देण्यात येत असून रुग्णांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

पहिल्या मजल्यावर न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी आणि इंडो-क्रोनोलॉजी विभाग आहेत. दुसऱ्या मजल्यावर गॅस्ट्रोलॉजी, नेफ्रोलॉजी, सर्जिकल गॅस्ट्रोलॉजी विभाग आहेत. व्हीआयपी कक्ष आणि जनरल रूम तिसऱ्या मजल्यावर असून ऑपरेशन थिएटर चौथ्या मजल्यावर असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगाव जिल्ह्यातील जनतेला दर्जेदार आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने रुग्णालय स्थापन करण्यात आले आहे. आपत्कालीन सेवा जनतेला उपलब्ध व्हावी यासाठी रुग्णालयाने सर्व सुविधांचा अवलंब केल्याचे त्यांनी सांगितले. बेळगावसह गोवा आणि महाराष्ट्रातील जनतेलाही याठिकाणी उत्तम दर्जाची आरोग्य सेवा उपलब्ध होईल, अशी माहित अशोक कुमार शेट्टी यांनी दिली.


Recent Comments