Banglore

काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नाहीत : मुख्यमंत्री

Share

 

 

अँक काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. असे असते तर निवडणुकीत आम्ही एकत्र काम करू शकलो नसतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केली.

आज म्हैसूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी बीजेपी नेत्यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्त्युत्तर दिले. काँग्रेसमध्ये कोणतेही मतभेद नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.(फ्लो)

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसच्या दृष्टिकोनातून चांगले वातावरण आहे. हि निवडणूक काँग्रेस पक्षाने गांभीर्याने घेतली आहे. त्यासाठी सहा महिने अगोदर उमेदवारांची निवड करण्यात आली असून उमेदवारांना रणनीती ठरविण्यासाठी तसेच मतदारांना भेटण्यासाठी वेळ मिळाला आहे. युतीचा या निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नसून मतदारांना योग्य निर्णय घेण्याची ताकद असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रज्वल रेवण्णा पेनड्राइव्ह प्रकरणाचा विधान परिषद निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार नाही. पदवीधर आणि शिक्षक क्षेत्रातील मतदार राजकीयदृष्ट्या परिपक्व आहेत. त्यांना योग्य आणि अयोग्य काय याची जाणीव आहे.

केंद्र सरकारच्या कामगिरीची आणि आपल्या सरकारच्या कामगिरीची तुलना करण्याची ताकद त्यांच्यात असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. आपल्याला इतर राज्यातील निवडणुकीच्या प्रचाराचे निमंत्रण मिळाले असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी कुमारस्वामींवरही त्यांनी ताशेरे ओढले. शिवाय महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यही प्रत्त्युत्तर दिले.

Tags: