Belagavi

बीएससी दि टेक्सटाईल्स मॉलमध्ये मोफत दंत तपासणी शिबीर

Share

बीएससी दि टेक्सटाईल्स मॉल आणि व्हाईट डेंटल क्लिनिकतर्फे मोफत दंत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे . सलग दिवस चालणाऱ्या या शिबिराचा प्रारंभ काल सोमवापासून झाला .

टिळकवाडीतील बीएससी दि टेक्सटाईल्स मॉल ही शोरूम वस्त्रप्रावरणांच्या विक्रीसह अनेक सामाजिक बांधिलकी जपत आहे . दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांनी आपल्या ग्राहकांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेचे मौखिक आरोग्य उत्तम राखण्याच्या हेतूने , दंत चिकित्सा शिबीराचे चार दिवस आयोजन केले आहे .

बीएससी दि टेक्सटाईल्स मॉलच्या आवारात सोमवार दि. 13 ते गुरुवारदि.16 मे पर्यटन सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत ह्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे . व्हाईट डेंटल क्लिनिक क्लिनिकच्या दंतचिकित्सक डॉ.स्नेहा व डॉ.निकिता गुर्जर दातांची तपासणी करुन मौखिक आरोग्यासंबंधीचा सल्ला शिबिरार्थींना देत आहेत . या शिबिराला ग्राहकांसह सर्वसामेनी सर्वसामान्य जनतेचा चांगला प्रतिसाद लाभत आहे .


या शिबिरासंबंधी माहिती देताना , बीएससी दि टेक्सटाईल्स मॉलचे स्टोअर सुपरवायजर इराण्णा शिवशेट्टी यांनी सांगितले कि , दरवर्षीप्रमाइन यंदा देखील आम्ही हा उपक्रम राबवत आहोत . बीएससी दि टेक्सटाईल्स मॉल आणि व्हाईट डेंटल क्लिनिकतर्फे मोफत दंत तपासणी शिबिराचे आम्ही आयोजन केले आहे . यासाठी प्रतिसाद चांगला लाभत आहे . चार दिवस चालणाऱ्या या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले .

सुमारे ३०० हुन अधिक जणांनी या शिबिरात सहभागी होऊन आपले दात तपासून घेऊन , दंत चिकित्सकांचा मौखिक आरोग्याबद्दल सल्ला घेतला .

Tags: