Vijayapura

कर्जबाजारीपणाला कंटाळून अर्जुनगी येथील शेतकरी महिलेची आत्महत्या

Share

अर्जुनगी येथील रुक्माव्वा दुंडप्पा बडगी (५२) या महिला शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

विजयपूर जिल्ह्यातील बबलेश्वर तालुक्यातील अर्जुनगी गावात ही घटना घडली आहे . बबलेश्वर पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला . आरोग्य अधिकाऱ्यांनी आत्महत्येच्या ठिकाणी पोहोचून मृत्यूची माहिती गोळा केली. त्यांनी घेतलेले 10 लाखांचे कर्ज फेडता न आल्याने तिने आत्महत्या केली.

बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील गडियाल गावात त्यांची जमीन आहे.गडियाल प्राथमिक कृषी सहकारी बँकेत १ लाख, विजयपूर एचडीपीसी बँकेत अडीच लाख. बबलेश्वरच्या चैतन्य फायनान्स मधून कर्ज घेतले आहे. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी व मोठा आप्तपरिवार आहे. राज्य सरकारने आत्महत्या केलेल्या शेतकरी महिलेला न्याय द्यावा व कर्जबाजारीपणाने आत्महत्या केलेल्या रुक्माव्वा बडगीच्या कुटुंबाला भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Tags: