Banglore

विधान परिषद निवडणूक – काँग्रेस उमेदवारांच्या नावांची घोषणा

Share

आगामी विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे आज जाहीर करण्यात आली.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली KPCC कार्यालयात परिषद निवडणुकीची बैठक घ्या आली . या बैठकीत विधान परिषदेच्या सहा जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली.

दक्षिण शिक्षक मतदारसंघात म्हैसूर, मंड्या, हसन, चामराजनगर लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो दक्षिण शिक्षक मतदारसंघासाठी मारितीब्बे गौडा, दक्षिण पूर्व शिक्षक मतदारसंघासाठी डी.टी. श्रीनिवास, आणि बंगळुरू पदवीधर मतदारसंघातून रामोजीगौडा यांचे नाव निश्चित करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि डीसीएम डी. शिवकुमार यांनी उमेदवारांना बी-फॉर्मचे वाटप केले.

जेडीएस पक्षातून आलेल्या नेत्यांना पहिल्यांदा बी फॉर्म वाटून काँग्रेसने पक्षांतर करणाऱ्यांना आश्रय दिला आहे. यावेळी भाजप आणि जेडीएस युती निवडणूक आमनेसामने आहे.

Tags: