हुक्केरी तालुक्यातील यमकनमर्डी पोलिसांनी गोवा दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. बेळगावचे पोलीस अधीक्षक भीमा शंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव शिरहट्टी यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांनी 28 लाख रुपये किमतीचे मद्य तसेच कंटेनर वाहन जप्त केले.

गोव्याहून महाराष्ट्र राज्याकडे निघालेल्या कंटेनर ट्रक क्रमांक एमएच 46 एएफ 4138 ची तपासणी करून 28 लाख रुपये किमतीचे गोवा बनावटीच्या दारूचे 1950 बॉक्स आणि 10 लाख रुपये किमतीचा कंटेनर ट्रक जप्त करून त्यांना अटक करून न्यायालयाच्या ताब्यात देण्यात आले.

या ऑपरेशनचे नेतृत्व गोकाक डीवायएसपी डी एच मुल्ला, पी एस आय ए पी मुल्ला, ए एस आय मुल्ला यांनी केले, पी एम अरबल्ली, एस. बी पुजेरी, वाय. जी. गुंजगी, एस एम बागेवाडी, बी के नागरी आदी कर्मचारी सहभागी झाले होते.
एस पी गुळेद यांनी यमकनमर्डी पोलिस कर्मचाऱ्यांच्या कार्याचे कौतुक केले.


Recent Comments