नदीवर आंघोळीला गेलेल्या व्यक्तीवर मगरीने हल्ला केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील सदलगा येथे घडली आहे .

चिक्कोडी तालुक्यातील सदलगा शहराजवळील दूधगंगा नदीत आंघोळीसाठी गेलेल्या महादेव पुन्नाप्पा खुरे (72) यांच्यावर मगरीने हल्ला केल्याने त्यांचा मृत्यू झाला. महादेव खुरे नदीत आंघोळ करत असताना एका मगरीने त्यांना ओढले आणि त्यामुळे महादेव खुरे यांचा मृत्यू झाला.
मयत महादेव खुरे यांचा मृतदेह सुकुमार उगारे या लष्करी जवानाच्या दृष्टीस पडला . हाय जवानाने तो मृतदेह पाण्याबाहेर काढला . शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. मृतदेह पाहून कुटुंबीयांना शोक अनावर झाला होता .


Recent Comments