Belagavi

भर प्रवासात बेळगावात निनादला शिवरायांचा जयघोष

Share

डौलाने फडकणारे भगवे ध्वज , झान्ज , ढोलताशा , करेल आणि विविध कसरतींच्या प्रात्यक्षिकांसह बेळगावमध्ये शिवजयंती चित्ररथ मिरवणूक पार पडली .

जोरदार पावसामुळे ह्या चित्ररथ मिरवणुकीला थोडासा उशीर झाला मात्र पावसाने उघडीप देताच तितक्याच जल्लोषात आणि उत्साहात मिरवणुकीचा प्रारंभ झाला . शहर पोलीस आयुक्त यंदा मार्टिन यांच्या हा असते शिवप्रतिमा असलेल्या पालखीचे पूजन करण्यात आले . टाळ मृदूंगाच्या गजरात पालखी मिरवणुकीला सुरुवात झाली . वडगाव येथील ज्ञानेश्वरी भजनी मंडळाच्या वारकर्यांनी यावेळी भजने सादर केली .

सालाबादप्रमाणे शिवजयंती उत्सव महामंडळाने मिरवणुकीचे नियोजन निश्चित केले होते . यावेळी डीजेला फाटा देत तालबद्ध रित्या भजन आणि ढोल ताशा वादांवर भर देण्यात आला होता .  शिव चरित्रातील प्रसंग सजीव देखाव्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले . शूरवीर कोंढाजी फर्जंद , प्रतापराव गुर्जर यांचा त्याग , अफझल खानाचा वध , रोहिडेश्वराची शपथ , शाहिस्तेखानची बोटे छाटल्याचा प्रसंग , शिवरायांचा जन्मसोहळा , माता जिजाऊ आणि दादोजी कोंडदेव आदी एकाहून एक सर्रास सजीव देखावे सादर करण्यात आले .

पोवाडे, भजने , आदींमुळे मिरवणुकीची रंगत आणखी वाढली . शिवाय करेला , दांडपट्टा , तलवारबाजी ,यासह इतर मर्दानी खेळ सादर करून शिवकालीन कलांची आठवण करून करून देण्यात आली . पावसाची रिपरिप सुरु असताना देखील शिवप्रेमींच्या उत्साह दांडगा दिसून आला . ही मिरवणूक दुसऱ्या दिवशी सकाळी पाच वाजेपर्यंत चालली .

Tags: