Belagavi

गोल्फ कोर्स येथील मॉर्निंग वॉकर्स क्लबच्या सदस्यांचा स्नेहमेळावा

Share

गोल्फ कोर्स येथील मॉर्निंग वॉकर्स क्लबच्या सदस्यांचा एक छोटेखानी कार्यक्रम यमकनमर्डी येथे आयोजिला होता या कार्यक्रमात बोलाताना पर्यावरण तज्ञ व जेष्ठ समाजसेवक शिवाजी कागणीकर यांनी मानवी हस्तक्षेपाने पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे होत असलेल्या दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन केले. तसेच आपण बंबरगा, कट्टनभावी, निंगेनहट्टी व गोरमट्टी येथे लोकसहभागातून निर्माण केलेल्या पाणी अडवा पाणी जिरवा व झाडे लावा बद्दल माहीती दिली.

बंबरगा येथे दोन डोंगराच्यामध्ये तयार केलेला छोटा बंधारा व खालील विहीर, कट्टनभावी येथील तलाव व 2 विहीरी, निंगेनहट्टी येथे दोन तलाव व गोरमट्टी येथील 2 विहीरी तसेच या संपूर्ण पंचक्रोशीत डोंगराच्या उतारावर समांतर चरी खोदून त्याशेजारी लावलेल्या जवळपास अडीच लाख झाडामूळेचं पाणी साठवणे शक्य झाले असे सांगितले. याप्रसंगी ॲड एन आर लातूर, प्रविण खोडा, समीर नाईक, राजू खोडा, गिरीश हत्तरगी या जेष्ठ कार्यकर्त्यांनी पर्यावरणाला मदत करणारा गोवंश सोबत घेऊन शाश्वत शेती करण्याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच हे ठिकाण भविष्यकाळात इतरांसाठी एक पायलट प्रोजेक्ट ठरावा असे मत व्यक्त लातूर सरांनी केले.

पाणी अडवा पाणी जिरवा व झाडे लावा या सिद्धांतानूसार आम्ही यमकनमर्डीजवळ मंगलदिप जैन विहार भवन येथे करत असलेल्या या प्रकल्पाबाबत जमलेल्या सर्वांनी कुतूहल दाखविले व प्रोजेक्टला शुभेच्छा दिल्या. यावेळी गिरीश हत्तरगी यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते चंदनाचे रोपटे लावले, कार्यक्रमाला प्रविण खोडा, निवृत्त न्यायाधीश उल्हास बाळेकुंद्री, ॲड एन आर लातूर, विजय पोरवाल, राजेश कामत, मारूती सांबरेकर, राजू खोडा, शंकर नाडगौडा, पत्रकार शिवराय योळकोटी, समीर नाईक, महांतेश बिसीरोटी, परशुराम गुरव, शिवाजी धुराजी, आनंद जमखंडी, भोला व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.

राहुल पाटील यांनी काही कार्यकर्त्यांना फिरून दाखवत प्रोजेक्टबाबत थोडक्यात माहीती दिली व येणाऱ्या काळात अजून दोन/तीन ठिकाणी याचप्रमाणे प्रोजेक्ट हाती घेणार आहोत असे सांगितले. कार्यक्रमानंतर सर्वांनी सुग्रास अशा स्नेहभोजनाचा आनंद घेतला.

Tags: