Belagavi

प्यास फाउंडेशनतर्फे गजपती गावातील तलावाचे पुनरुज्जीवन

Share

प्यास फाउंडेशन आणि जिनाबाकुल फोर्जच्या सहकार्याने बेळगाव तालुक्यातील गजपती या गावातील तलावाचे पुनरुज्जीवन करण्याची योजना आखण्यात आली आहे.

बेळगावमधील प्यास फाउंडेशनने जिनाबाकुल फोर्जच्या सहकार्याने गजपती गावातील सहा एकर तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. तलावाचे पुनरुज्जीवन करण्याचे काम हाती घेण्यात आल्याने या तलावात अतिरिक्त १ लाख घनमीटर पाणी साठ्याची क्षमता वाढणार आहे. या योजनेमुळे या भागातील पाणी टंचाईवर मात करता येणे शक्य होणार आहे.

Tags: