Belagavi

भाजप नेत्यांच्यावतीने शिवरायांना मानवंदना

Share

बेळगावमध्ये सुरु झालेल्या शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आज भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.

बेळगाव शहरातील छत्रपती शिवाजी उद्यानात माजी आमदार तसेच भाजप राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके, नगरसवेक राजू डोणी, संतोष पेडणेकर, श्रीनिवास बिसनकोप्प, विजय कदम, प्रवीण महिंद्रकर, श्रीमती सविता करडी, किरण जुग्गन्नावर, संतोष बोकडे यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.

Tags: