प्रज्वल रेवण्णा अश्लील व्हिडीओ पेनड्राइव्ह प्रकरणात उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा हात असल्याचा आरोप करत बेळगावमध्ये जेडीएस कार्यकर्त्यांनी रस्ता रोको केला.
राणी कित्तूर चन्नम्मा चौकात रास्ता रोको करत सरकारविरोधात जेडीएस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. डी. के. शिवकुमार यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत जेडीएस कार्यकर्त्यांनी डीकेशींच्या प्रतीकात्मक पुतळ्याचा निषेध व्यक्त केला. प्रज्वल रेवण्णा प्रकरणी डीकेशी खलनायक असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला.
यावेळी बोलताना जिल्हा जेडीएस अध्यक्ष शंकर मूडलगी म्हणाले, प्रज्वल रेवण्णा प्रकरणी चौकशी साठी नेमण्यात आलेले एसआयटी पथक राज्य सरकारच्या हातचे बाहुले आहे. सिद्धरामय्या, डी. के. शिवकुमार यांच्या म्हणण्यावरून या पथकाचे काम चालते. एच. डी. रेवण्णा यांना जाणीवपूर्वक कारागृहात पाठविण्यात आले असून प्रज्वल रेवण्णा पेनड्राइव्ह मागे राज्य सरकारचा हात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. शिवाय सदर प्रकरणी सीआयडी तपास करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली.

या आंदोलनात बेळगाव जिल्हा जेडीएस अध्यक्ष शंकर मूडलगी, बी. एस. रुद्रगौडार, इराण्णा रेवडे, शंकर गौडा पाटील, मारुती अष्टगी, कल्लाप्पा मग्गन्नावर आदींसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.


Recent Comments