Belagavi

बसव ज्ञान गुरुकुलातील मुलांनी रेखाटल्या विज्ञान रांगोळ्या

Share

असमानतेच्या विरोधात समाजाच्या क्रांतिकारी बदलामध्ये बसवण्णांचे योगदान मोठे आहे. त्यांनी समाजातील जातीव्यवस्था नष्ट करून सामाजिक न्यायासाठी लढा दिला आणि संपूर्ण मानवजातीसाठी ते प्रकाश ठरले आहेत. बसवण्णांचे कायक तत्वज्ञान प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजे.असे कारंजी मठाचे उत्तराधिकारी शिवयोगी देवरु म्हणाले.

बेळगाव लिंगायत संघटना वर्धापन दिन व बसव जयंती निमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन पूज्यश्री गुरुसिद्ध महास्वामीजींच्या दिव्य उपस्थितीत पार पडले .

करंजी मठाचे उत्तराधिकारी शिवयोगी देवरु म्हणाले की, बाराव्या शतकातील बसवण्णा यांनी मांडलेली तत्त्वे मानवी समाजाला दिशादर्शक प्रकाश देणारे आहेत. त्यांनी समाजातील जातिव्यवस्था नष्ट करून सामाजिक न्यायासाठी लढा दिला आणि संपूर्ण मानवजातीसाठी ते प्रकाश ठरले आहेत. बसवण्णांचे कायक तत्वज्ञान प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगीकारले पाहिजे. बसवण्णांचे अनुयायी म्हणून आपण पंचांग आणि ज्योतिष ऐकण्यात वेळ घालवतो. बसवण्णांच्या प्रतीमेला आपण घरामध्ये जागा दिली आहे का? असे ते म्हणाले .

तसेच लिंगायत संघटनेच्या वर्धापन दिन व गुरु बसव जयंती निमित्त बसव ज्ञान गुरुकुलातील मुलांनी विज्ञान रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते. लिंगायत संघटनेचे अध्यक्ष व सर्व सदस्य उपस्थित होते

Tags: