Athani

पोहण्यासाठी गेलेला तरुण विहिरीत बुडाला

Share

विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील अनंतपूर गावात घडली.

अनंतपुर गावातील शिवानंद मधू मेत्री (वय २१ ) या तरुणाचा बुडून मृत्यू झाला . मयत शिवानंद हा दिवसभर घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता तो अनंतपूर गावातील मेत्री यांच्या शेतविहीरीत येथे पोहायला गेला असल्याची माहिती मिळाली . त्यांनी ताबडतोब अग्निशामक दलाला पाचारण केले .

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळावरून मृतदेह बाहेर काढला, शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. अथणी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: