राज्यात दुसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदान प्रक्रियेनंतर चिकोडी भागातील जोल्ले कुटुंबीयांनी विश्रांती घेत प्रसन्न वातावरणात कुटुंबियांसमवेत वेळ घालवला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दुसऱ्या टप्प्यात झालेल्या १४ लोकसभा मतदार संघांपैकी चिकोडी लोकसभा मतदार संघासाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली. गेल्या महिन्याभरापासून निवडणुकीच्या कामात व्यस्त असणाऱ्या जोल्ले कुटुंबीयांनी निवडणुकीच्या रणधुमाळीपासून विश्रांती घेतली.
निवडणुकीचा प्रचार, विविध भागात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आयोजिले दौरे या सर्व निवडणूक प्रक्रियेच्या कामकाजातून निपाणी येथील जोल्ले कुटुंबीयांनी काही वेळासाठी विश्रांती घेतली. एकसंबा येथील निवासस्थानी आपल्या फुलांच्या बागेत आमदार शशिकला जोल्ले, बसवप्रसाद जोल्ले, यशस्विनी जोल्ले आणि प्रिया जोल्ले यांच्यासह संपूर्ण कुटुंबातील सदस्यांसमवेत जोल्ले कुटुंबीयांनी वेळ घालवला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना, निवडणुकीच्या व्यस्त कामातून थोडी विश्रांती घेत स्वच्छंद परिसरात मोकळेपणाने कुटुंबासमवेत वेळ घालवून मन प्रसन्न झाल्याचे जाल्लेंनी सांगितले.


Recent Comments