Belagavi

सांबरा गावात तब्बल १८ वर्षानंतर होणार श्री महालक्ष्मी जत्रा :जत्रेनिमित्त गावात अंकी घालण्याचा कार्यक्रम

Share

सांबरा येथील श्री महालक्ष्मी देवीचा यात्रोत्सव तब्बल १८ वर्षांनंतर १४ मे रोजी होणार आहे . त्या निमित्ताने परंपरेनुसार अंकी घालण्याचा म्हणजेच घटस्थापनेचा कार्यक्रम गावात पार पडला .

सांबरा गावात तब्बल १८ वर्षांनंतर श्री महालक्ष्मी यात्रोत्सव होणार आहे . यानिमित्ताने गावात अंकी घालण्याचा कार्यक्रम पार पडला . यात्रेच्या नऊ दिवस आधी हा कार्यक्रम केला जातो . नऊ दिवस गावात कोणीही मांसाहार करीत नाही . शुभ कार्य म्हणजे वस्तू शांती , गृहप्रवेश , भूमिपूजन वगैरे गोष्टीत करायच्या नाही असे यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी सांगितले . त्याचप्रमाणे यात्रोत्सव काळात देवीच्या दर्शनासाठी हजारो लोक येणार आहेत . ही यात्रा व्यवस्थित पार पाडावी यासाठी , तसेच यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य करावे .

विविध विभागाच्या सहकार्याने यात्रा यशस्वी करूयात असे आवाहन त्यांनी केले . मंगळवार दि. १४ मे पासून सांबरा महालक्ष्मी यात्रेची सुरुवात होणार होणार आहे. याचदिवशी पहाटे देवीचा विवाहसोहळा पार पडणार असून मंगळवार दि. १४ मे ते शुक्रवार दि. १७ मे पर्यंत पारंपरिक रथोत्सव पार पडणार आहे. सूर्योदय ते सूर्यास्तापर्यंत देवीचा व्हन्नाट होणार आहे, त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी देवी गदगेवर विराजमान होईल. या रथोत्सवातही भाविक ओटी भरू शकतात. तसेच शुक्रवार दि. १७ मे ते २२ मे यादरम्यान गदगेवर विराजमान झालेल्या देवीचा ओटी भरण्याचा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे, अशी माहिती यात्रा कमिटीचे अध्यक्ष राजू देसाई यांनी दिली.

यापूर्वी १९५०, १९८६, २००६ अशा एकूण तीन महालक्ष्मी यात्रा पार पडल्या आहेत. २०२४ साली होणारी यात्रा हि १८ वर्षानंतर भरविण्यात येत असून यात्रेला येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी पार्किंग व्यवस्था, पाण्याची सोय करण्यात आली असून यात्रेच्या पार्श्वभूमीवर रस्ते, गटारी सह इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्याची माहिती नागेश देसाई यांनी दिली.

यावेळी यात्रा कमिटीचे पदाधिकारी, सदस्य, हक्कदार, पंच कमिटी, युवक आणि महिला मंडळाचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: