मंगल कार्यालयात वधूवरांचे दागिने चोरणाऱ्या उज्ज्वलनगर येथील एकाला टिळकवाडी पोलिसांनी अटक केली आहे . त्याच्याजवळून ४ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत .
सोहेल मौला ताशावाले (वय २६) राहणार उज्ज्वलनगर असे या अटकेतील आरोपीचे नाव असून त्याच्याजवळून ५८.४ ग्रॅम वजनाचे , ४ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत . टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक कपिलदेव गडाद व त्यांच्या सहकार्यांनी ही कारवाई केली . आरोपी सोहेल याने गेल्या आठ दिवसांत दोन मंगल कार्यालयात शिरून दागिने चोरले होते .
दिनांक १३ एप्रिल रोजी महावीर भवन येथे तर , २१ एप्रिल रोजी सिटी हॉल भाग्यनगर येथे झालेल्या लग्न समारंभात सोहेलने दागिने चोराने होते . यासंबंधी टिळकवाडी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता . कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेजवरून , टिळकवाडी पोलिसांची चोरटीचा शोध घेतला . त्याची कसून चौकशी केली असता त्याने गेल्या महिन्यात दोन मंगल कार्यालयात दागिन्यांची चोरी केल्याची कबुली दिली .
टिळकवाडी पोलिसांच्या या कारवाईचे पोलीस आयुक्त तसेच डीसीपी स्नेहा यांनी कौतुक केले आहे .


Recent Comments