बेळगावात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन निष्पाप लहान मुले गंभीर जखमी झाल्याची घटना गांधीनगर मंध्ये भर दुपारी घडली आहे .
बेळगाव शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे . ४ दिवसांपूर्वी उज्ज्वलनगर मध्ये भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच आज शनिवारी गांधीनगर येथील निझामिया गल्लीतील कैफ पाच्छापूर आणि ऐझाल पठाण ही पाच वर्षीय मुले कुत्र्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाली आहेत . त्यापैकी एका मुलाच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्या चेहऱ्याला प्लास्टिक सर्जरी करण्याची वेळ निर्माण झाली आहे . या जखमी मुलांना तातडीने हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले . या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे .
नगरसेवक अजीम पटवेगार तसेच समाजसेवक सय्यद मन्सूर यांनी भेट देऊन यानी भेट देऊन मुलांच्या प्रकृतीची विचारपूस केली . यासंबंधी समाजसेवक मन्सूर सय्यद यांनी सांगितले कि , महानगर पालिका भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात अपयशी ठरली आहेत . शहरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढत चालला आहे . लहान मुलांवर हल्ले होत आहेत . पालिकेने तातडीने ह्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हीच या कुत्र्यांना पकडून आणून महापालिकेत सोडू असा इशारा दिला .
आतातरी महानगर पालिका सतर्क होऊन या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करते कि नाही हे पाहावे लागेल


Recent Comments