बेळगाव तालुक्यातील बडाल अंकलगी गावात यल्लाप्पा भीमप्पा रामण्णवर यांच्या झोपडीला अचानक आग लागून संपूर्ण झोपडी जळून खाक झाली. या प्रकरणाची माहिती मिळताच महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घटनास्थळी धाव घेत कुटुंबाना धीर दिला . याशिवाय 50 हजारांची वैयक्तिक मदत देण्यात आली.
बडाल अंकलगी गावात काल दुपारी २ च्या सुमारास यल्लाप्पा भीमप्पा रामण्णा यांच्या घराला अचानक आग लागल्याने घरातील सोने, चांदी, शेडमधील 2.50 लाखांचा ऐवज व दैनंदिन वापरातील साहित्य जळून खाक झाले.

यल्लाप्पा भीमप्पा रामण्णवर नवीन घर बांधत होते, त्यामुळे संपूर्ण कुटुंब एका झोपडीत स्थलांतरित झाले. घरात पैसे आणि सामान होते. मात्र अचानक लागलेल्या आगीत कुटुंबाने सर्वस्व गमावले. या घटनेने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे .
निवडणुकीच्या प्रचारासाठी असलेल्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी वृत्त समजताच तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मंत्र्यांनी वैयक्तिकरित्या कुटुंबाला 50,000 रुपयांची मदत दिली आणि ‘या कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना करा, मी तुमच्या पाठीशी आहे’ असे वचन दिले.
यावेळी बडाल अंकलगीचे ग्रामस्थ व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments