Bailahongala

होळीहोसूर येथे कित्तूर आणि बैलहोंगल पोलिसांची संयुक्त कारवाई :890 लिटरचा अवैध मद्यसाठा जप्त

Share

बैलहोंगल मधील होळीहोसूर येथे कित्तूर आणि बैलहोंगल पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत , ८९० लिटर मद्य जप्त केले आहे .

मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार होळीहोसूर येथील रुद्रप्पा तोरगल या व्यक्तीच्या घरावर कित्तूर आणि बैलहोंगल पोलिसांनी छापा टाकून अवैध रित्या साठा केलेले ८९० लिटर मद्य जप्त केले . याप्रकरणी रुद्राप्पा भीमप्पा तोरगल राहणार होळीहोसूर तसेच

नागप्पा गंगाप्पा गोरकोल्ल , राहणार मूळचा चिवटगुंदी सध्या राहणार एम के हुबळी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

या छाप्यात 90 मिली ची , ओरिजिनल चॉईस व्हिस्कीची 3,83,712रुपये किमतीची 9600 पॅकेट्स तसेच 17,660 किमतीची 288 मॅकिंटॉश चॉईस व्हिस्की पॅकेट असे एकूण ८९० लिटर मद्य जप्त करण्यात आले आहे .

Tags: