Belagavi

जगदीश शेट्टर यांचा बेळगावच्या विविध भागात प्रचार :दुकानदार , व्यापाऱ्यांकडे केली मतयाचना

Share

बेळगाव लोकसभानिवडणुकीचे भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी शहरातील विविध भागात प्रचार केला.

भाजपचे उमेदवार जगदीश शेट्टर यांनी बेळगाव बाजारपेठेत जोरदार प्रचार केला, बापट गल्ली, खडे बाजार, समादेवी गल्ली आदी भागात फिरून दुकानदार तसेच व्यापाऱ्यांकडे मतयाचना केली . त्यांनी खडेबाजार येथे मेट्रोकास्ट कंपनीचे संचालक नागेश छाब्रिया यांची भेट घेऊन भाजपला मतदान करण्यास सांगितले.

महिला सुरक्षेच्या माध्यमातून देशाची सुरक्षा पाहता नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हायला हवे, असे महिला मंडळाच्या बैठकीत बोलताना जगदीश शेट्टर म्हणाले.

Tags: