धर्मनिरपेक्ष तत्व, भारतीय राज्यघटना कायम ठेवण्यासाठी सर्वांनी काँग्रेस पक्षाला साथ द्यावी. माजी राज्यसभा सदस्य आणि बेंगळुरू उत्तर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार प्रा. राजीव गौडा म्हणाले.
बेळगाव मेथोडिस्ट चर्च च्या जे.टी. सीमेन्स हॉलमध्ये आयोजित ख्रिश्चन समुदायाच्या नेत्यांच्या बैठकीत ते बोलत होते धर्मनिरपेक्ष तत्त्व टिकवायचे असेल तर काँग्रेस पक्षाचा विजय झालाच पाहिजे, असे ते म्हणाले.
केंद्र सरकारकडून कर्नाटकला सातत्याने अन्यायकारक वागणूक दिली जात असून, याविरोधात आवाज उठवण्यासाठी मृणाल हेब्बाळकर यांच्यासारख्या तरुण खासदारांना विजयी केले पाहिजे. प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदी म्हणालेत की, कर्नाटकच्या जनतेने पाप केले आहे. भाजपचे २५ खासदार जिंकून कर्नाटकातील जनतेने पाप केले आहे, असा पलटवार राजीव गौडा यांनी केला खरा.
केंद्रात काँग्रेसचे सरकार येऊन राज्यावर अन्याय केल्यास आम्ही विरोध करू. कर्नाटकातून काँग्रेसचे आणखी उमेदवार विजयी झाले पाहिजेत. याचा लाखो महिलांना फायदा झाल्याचे राजीव गौडा म्हणाले. समाजात शांतता आणि सौहार्द हवा असेल तर काँग्रेसला मतदान करा. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या की, काँग्रेस सरकारने ख्रिश्चन महामंडळ केले असून 100 कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे.
भाजप तिसऱ्यांदा सत्तेवर आल्यास प्रत्येकाच्या मतदानाच्या अधिकारावरही गदा येईल. काँग्रेसच्या उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांना विजयी करून सर्वांच्या उत्कर्षासाठी परिश्रम घेणार असल्याचे मंत्री महोदयांनी सांगितले.
यावेळी बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार राजू आसिफ सेठ, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद नालापड यांची भाषणे झाली. यावेळी करकल काँग्रेसचे नेते उदय कुमार शेट्टी मुनियालू, फादर डी. शांताप्पा अंकलगी, जॉन हंचिनमनी, मधुकर उत्तंगी, सीटी थॉमस, मेथोडिस्ट एपिस्कोपल सोसायटीचे अध्यक्ष दिनकर चिल्लाल यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.


Recent Comments