Belagavi

हिरे बागेवाडी उरूस हे अध्यात्माचे प्रतीक : पाच दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन

Share

बेळगावजवळील हिरे बागेवाडीत आता उत्सवाचे वातावरण आहे. सय्यद मुहम्मद गौस शाह कादरी संदल आणि उरूस सुरु झाल्याने हजारो भाविक येऊन दर्शन घेत आहेत .

या उरुसाचे वैशिट्य म्हणजे हा उरूस हिंदू आणि मुस्लिम बांधव मी मिळून साजरा करतात . पाच दिवस चालणाऱ्या उरुसामध्ये , धार्मिक आणि पारंपारिक विधी करतात. हा एक असा उरूस आहे जो प्राचीन काळापासून हिंदू आणि मुस्लिमांनी कोणताही जातीय भेदभाव न करता साजरा करतात . आणि शेकडो वर्षांपासून शेजारील महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूर सारख्या गावातील हजारो लोक या कार्यक्रमाला येतात आणि दर्शन घेतात.

सय्यद मुहम्मद गौस शाह कादरी संदल उरूस शेकडो वर्षांपासून साजरा केला जात आहे, उरूस हा केवळ मुस्लिम समाजाचा विधी नसून हिंदूंचे उपासनेचे साधन आहे. येथे उरूस सोहळ्यासाठी जातिभेद पळाला जात नाही.अशी माहिती सय्यद संमूल पीर यांनी दिली .

अश्रफ पीर म्हणाले की, हिंदू मुस्लिमांचा उरूस प्राचीन काळापासून साजरा केला जात असून तो शेकडो वर्षांपासून येथे सुरू आहे.
उरूसानिमित्त कव्वाली कार्यक्रम, कुस्ती स्पर्धा, नाटके सुरू आहेत.

Tags: