मासेमारी करताना जाळ्यात अडकून एका व्यक्तीला जीव गमवावा लागल्याची हृदयद्रावक घटना अथणी तालुक्यातील येथील सत्ती गावात आज सकाळी घडली.

अथणी तालुक्यातील हलियाळ गावातील महंतेशा दुर्गाप्पा करकरमुंडी (३५) या मच्छीमाराचा दुर्दैवी मृत्यू झाला . . महांतेश हा नेहमीप्रमाणे आज सकाळी सत्ती गावाच्या हद्दीतील कृष्णा नदीत मासेमारीसाठी गेला असता त्याचा पाय घसरून तो बुडाला.
स्थानिक लोकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला असून अथणी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.


Recent Comments