किरकोळ पैशासाठी परिवहन बसमधून प्रवास करणाऱ्या तरुणाने महिला कंडक्टरला मारहाण केल्याची घटना शहरातील मंगळवारी चन्नम्मा सर्कल येथे घडली.
बसमध्ये किरकोळ पैसे देण्यावरून एका तरुणाने बेळगाव होनागा शहरी बसमध्ये कार्यरत असलेल्या महिला कंडक्टरसोबत हुज्जत घातली.
हा तरुण यमनापुर गावातून बसमधून प्रवास करत असल्याचे सांगण्यात येत आहे. बसमध्ये शिवीगाळ करताना तो कोणाला शिव्या देतोय, असे विचारताच तरुणांने थोबाडीत मारले .
शोभा गाणगी या महिला कंडक्टरला तरुणाने शिवीगाळ करून मारहाण केली. तरुणाने केलेल्या मारहाणीमुळे महिला कंडक्टर रस्त्यात रडत बसली . त्यानंतर बसमधील प्रवाशांनी तरुणाला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना एपीएमसी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत घडली.


Recent Comments