Belagavi

बेळगावात मतदान जनजागृतीसाठी हॉट बलून सफारी

Share

7 मे रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी , सर्वांनी सक्तीने मतदान करावे, असे आव्हान जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले.

बेळगाव शहरातील सरदार हायस्कूल मैदानावर हॉट एअर बलूनद्वारे मतदान जागृती करण्याच्या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी नितेश पाटील यांनी केला .


जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांनी सांगितले की, बेळगावात मतदान जागृतीसाठी हॉट एअर बलूनची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येकाने 07 मे रोजी मतदान सक्तीचे करावे आणि आजच्या दिवशी प्रत्येकाला हॉट एअर बलूनमध्ये उडता येईल.

सीईओ राहुल शिंदे यांच्यासह आयुक्त, विविध अधिकारी व नागरी सेवक सहभागी झाले होते

Tags: