विजयपूर जिल्ह्यातील इंडी तालुक्यातील सुक्षेत्र लच्यान गावात सिद्धलिंग मुथना जत्रा उत्सवादरम्यान रथाच्या चाकाखाली सापडून झालेल्या अपघातातील मृतांची संख्या तीन झाली आहे. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अभिषेक मुजगोंडा (17), सोबू सिंदे (51), सुरेश कटकदोंड (36) अशी मृतांची नावे आहेत. रविवारी रथोत्सवात हजारो भाविक सहभागी झाले होते. जत्रेत रथाच्या मिरवणुकीत झालेल्या चेंगराचेंगरीत सात जण रथाच्या चाकात अडकले. त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. रुग्णालयात नेत असताना आणखी एकाने अखेरचा श्वास घेतला. यात चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना विजयपूर जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेने भाविक दु:खी झाले आहेत.
Recent Comments