विजयपुर शहरातील गांधीचौक पोलीस ठाण्यात ही घटना घडली असून पोलिसांनी चार तासांत सोन्याच्या वस्तू हरवल्याचा गुन्हा दाखल करून, ते शोधून दाम्पत्याला सोने परत दिले.
रवींद्र यरनाळ नामक व्यक्ती , 9 तोळे सोने असलेली बॅग ऑटोमध्ये विसरले होते . याप्रकरणी यर्नाळ दाम्पत्याने फिर्याद दिली होती . या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तपास केला असता चार तासांत सोन्याच्या वस्तू सापडल्या. तसेच ऑटोचालक रफीक कन्नुर याने सोन्याच्या वस्तू खोलीतसुरक्षित ठेवल्या होत्या .
त्यानंतर पोलिसांनी ऑटोचालकाचा शोध घेतला त्यावेळी त्याने ते सोने पोलिसांकडे सोपवले . त्याबद्दल ऑटोचालक रफीक कन्नुर याचा पोलिसांनी गौरव केला. सीपीआय द्यामन्नावर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. ही घटना गांधीचौक पोलिस ठाण्याच्या व्याप्तीत घडली.


Recent Comments