लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार आणि एआयसीसीचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे उद्या विजापूरमध्ये येत आहेत. काँग्रेसचे उमेदवार राजू अलगूर यांच्या प्रचारार्थ त्यांचा विजापूर दौरा निश्चित झाला आहे.
या पार्श्वभूमीवर विजापूर जिल्हा पालकमंत्री एम. बी. पाटील यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी केली. यावेळी बोलताना ते म्हणाले २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता राहून गांधी यांचे विजापूरमध्ये आगमन होईल. यावेळी मुख्यमंत्री एस. सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार, एआयसीसीचे सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली .
या कार्यक्रमात ५० हजारांहून अधिक लोक सहभागी होणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली यावेळी पक्षाचे जिल्हाध्यक्ष मल्लिकार्जुन लोणी, हमीद मुश्रीफ, डॉ.बाबू राजेंद्र नाईक आदी उपस्थित होते.


Recent Comments