आंतरराष्ट्रीय हिवताप दिनाचा एक भाग म्हणून शासकीय नर्सिंग स्कूल व बिम्स महाविद्यालय, ग्रामपंचायत कडोली, प्राथमिक आरोग्य केंद्र कडोली यांच्या संयुक्त विद्यमाने कडोली गावातील विद्यार्थ्यांनी मलेरिया दिनानिमित्त जागृती रॅलीचे आयोजन केले होते.
कडोली प्राथमिक आरोग्य केंद्रात ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी भंडारी, प्रकाश कोडली व नामदेव माळगी, शासकीय नर्सिंग स्कूल व महाविदयालय बी.आय.एम.चे मुख्याध्यापक यांच्या हस्ते रॅलीला चालना देण्यात आली.

त्यानंतर शासकीय नर्सिंग स्कूल व कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मलेरियावर पथनाट्य सादर करून जनजागृती केली. या रॅलीत डॉ. मंजुनाथ कांबळे, बिम्स हायस्कूल, शिक्षक कर्मचारी भीमप्पा कोणी, श्रीशैला गोवरी, आयशा बेगम, डॉ.सुनंदा कटारा व विद्यार्थी सहभागी झाले होते.


Recent Comments