महाराष्ट्रातील मांजरी बॅरेजमधून कृष्णा नदीत पाणी सोडण्यात आले असून इंगळी गावातील कोरड्या पडलेल्या कृष्णा नदीच्या पात्रात पाण्याचा प्रवाह सुरु झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंगळी गावात असलेली कृष्णा नदी पूर्णपणे कोरडी पडली असून, तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली होती. शेतकऱ्यांनी हजारो रुपये खर्चून उभी केलेली पिके पाण्याविना सुकू लागली होती. पाण्याच्या व्यवस्थेसाठी शेतकरी व ग्रामस्थांचा संघर्ष सुरू होता. दरम्यान याची दखल घेत खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्या नेतृत्वाखाली भाजप नेत्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कृष्णा नदीत पाणी सोडण्याची विनंती केली. या विनंतीला अनुसरून नदीत पाणी सोडून दिलासा दिला आहे. मांजरी बंधाऱ्यातून इंगळी गावात पाणी पोहोचल्याने ग्रामस्थांनी कृष्णा नदीचे पूजन करून आनंद व्यक्त केला आणि खासदार अण्णासाहेब जोल्ले यांचे आभार मानले.
यावेळी वाल्मिकी माने, श्रीपाल समाजे, प्रकाश मिरजे, महादेव लोकरे, आप्पासाहेब पाटोळे, महादेव कांबळे, सुनिल आरगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.


Recent Comments