Belagavi

दहशतवाद आणि हत्या काँग्रेस हलक्यात घेत आहे : मालविका अविनाश

Share

राज्यातील दहशतवाद आणि हत्याकांडांना राज्य सरकार हलक्यावर घेत असून, राज्य सरकार समाजाला वेठीस धरत असल्याचा संताप भाजप प्रदेश उपाध्यक्षा मालविका अविनाश यांनी व्यक्त केला.

बेळगाव मधील शहर भाजप कार्यालयात बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होते. त्या पुढे म्हणाल्या, 26 एप्रिल रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी आम्ही सज्ज आहोत. मोदींनी लोकांच्या मनात घर केले आहे. गेल्या दहा वर्षातील कामगिरी समोर ठेवून आपण निवडणुकीला सामोरे जात आहोत. दहा वर्षांपूर्वी देशाची अर्थव्यवस्था चांगली नव्हती. मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशाची अर्थव्यवस्था चांगली आहे.

महिलांचे सक्षमीकरण हे मोदींचे उद्दिष्ट होते. आता आपण महिला विकासाकडे वाटचाल करत आहोत. 2047 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळून 100 वर्षे पूर्ण होतील. विकसित भारत घडवण्यासाठी संसदेत 370 हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार आहे. राज्यातील 28 पैकी 28 मतदारसंघात आपण विजयी होऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

त्या पुढे म्हणाल्या, बेंगळुरूमधील रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोटाचीही राज्य सरकारने गांभीर्याने दखल घेतली नाही. एनआयएने कोलकाता आणि तामिळनाडूमध्ये तपास करून अटक केली. आपल्याला योग्य आश्रय मिळेल या भावनेने आरोपी या दोन राज्यात लपून बसले होते. राज्य सरकारच्या तुष्टीकरण धोरणामुळे राज्यात निरपराधांच्या हत्या होत असून जनतेला संरक्षण नाही. जनतेच्या सुरक्षेकडे राज्य सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

आमच्याकडे नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आहे पण काँग्रेसकडे कुणाचे नेतृत्व आहे हे त्यांनी जाहीर करावे असे आव्हान मालविका अविनाश यांनी काँग्रेसला दिले  बेळगाव लोकसभेचे उमेदवार जगदीश शेट्टर यांना पाठिंबा देत येत्या ७ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत त्यांना बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यानीं केले.

बेळगाव भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बेळगाव दौऱ्याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी मालविका अविनाश, गीता सुतार, सुभाष पाटील, हणमंत कोंगाली आदी उपस्थित होते.

Tags: